Dainik Maval News : प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वर्षभरापूर्वी अतुल परचुरे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केल्याची महिती स्वत: दिली होती. अतुल परचुरे हे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते होते. मराठी नाटक, मालिका आणि सिनेमातून ते घराघरात पोहोचले होते. अतुल परचुरे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला. (Famous Marathi comedian Actor Atul Parchure Died)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमोल कोल्हे म्हणाले म्हणाले की, “अभिनय क्षेत्रातील माझे सहकारी व मित्र, आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे, मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत ही आपल्या कलेचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाहिली श्रद्धांजली –
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट :
रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका… pic.twitter.com/RqvCuXSmCn
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2024
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विजयादशमी निमित्त वडगावमधील शिवभक्त तरुणांचा अनोखा उपक्रम; शिवकालीन वेशभूषेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा
– ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली तर्फे चाकण – वराळे नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ । Maval News
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी