पावसाळा म्हटलं की पर्यटन हे आलंच. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळापासूनच पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. विकेंड किंवा जोडून आलेल्या सुट्टया दिवसांत पर्यटन स्थळे गजबजून जातात. परंतू पावसाळी पर्यटनातही नेमके कोणतं पर्यटन करायचे, हा अनेकांसाठी प्रश्न असतो. यातही किल्ले, डोंगर यांची चढाई करण्यासाठी, ट्रेकिंगसाठी, धरण-तलाव आदी ठिकाणी फॅमिलीसोबत जाणे, एखाद्या हिल स्टेशन ठिकाणी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत जाणे किंवा कृषी पर्यटन अशा अनेक गोष्टी समोर असतात.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंडळी जर तुम्ही पावसाळ्यात वरीलपैकी कोणताही एक पर्याय पर्यटनासाठी निवडत असाल, आणि फिरण्यासाठी तुम्हाला बाहेर पडायचं असेल, आणि तुम्ही मुंबई किंवा पुणे अशा शहरांच्याजवळ राहत असाल तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा पर्याय तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. याचे कारण पावसाळ्यात मावळ तालुका आण येथील विविध पर्यटन स्थळे म्हणजे पृथ्वीवरील सर्वच आहेत, अशी भासतात. ( Famous Tourist Places In Maval Taluka In Rainy Season Dainik Maval News )
मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यात तुम्ही पावसाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला खालील पर्याय आहेत;
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, बेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर अशी एकापेक्षा एक सरस ठिकाणे मावळ तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना खुणावत आहेत.
विशाल कुंभार – संपादक
अधिक वाचा –
– कुंडमळा इथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत सूचनांचे फलक, पर्यटकांना ‘हे’ खास आवाहन
–लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू