नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे जग सज्ज झाले आहे. अशात 2022 वर्षाला बाय-बाय करण्यासाठी आणि 2023 वर्षाला वेलकम करण्यासाठी खास ठिकाणी जाण्याची सर्वांचीच इच्छा असते. अशावेळी प्रसिद्ध पर्यटन स्थळी जाण्याकडे सर्वांचाच ओढा असतो. मात्र, मावळ तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांपैकी काही ठिकाणे अशी खास आहेत की जिथे तुम्ही तुमच्या नववर्षाचे सेलिब्रेशन अगदी जोशात करु शकता. ( Famous Tourist Places In Maval Taluka To Welcome New Year 2023 Be Sure Visit Here )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील या 3 ठिकाणी करा नववर्षाचे स्वागत…
पवना धरण – लेक कॅम्पिंग, तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर किल्ले
मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असलेल्या पवना धरण परिसरात अनेक ठिकाणी राहण्याची सोय आहे. तसेच इथे पसरलेल्या लेक कॅम्पिंग व्यावसायामुळे पर्यटक टेन्टमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकतात. पवनाधरणाच्या जलाशयाच्या सभोवताली राहुन नववर्षाचे स्वागत करणे आणि सरत्या वर्षाला निरोप देणे हा अनुभव पर्यटकांकरिता निश्चितच खास ठरु शकतो.
लोणावळा – शहर, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, भुशी डॅम
लोणावळा शहर हे पर्यटकांचे पहिल्या पासूनच आकर्षणाचे केंद्र राहिलेले आहे. लोणावळा शहर, भुशी डॅम, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट आदी ठिकाणांमुळे वर्षभर लोणावळा शहराकडे पर्यटकांचा ओढा असतो. अशात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
खंडाळा – ड्यूक्स नोझ, तलाव
लोणावळा शहराच्या जवळीलच खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण पर्यटनासाठी सर्वांनाच नेहमी आकर्षण करते. येथील लहान मोठी अनेक ठिकाणे फिरस्त्यांना नेहमीच खुनावतात. राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय येथे होत असल्याने या भागात तुम्ही 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीची पर्यटनवारी करु शकता.
यासह संपूर्ण मावळ तालुक्यात अनेक ठिकाणे अशी आहेत, जिथे तुम्ही 31 डिसेंबरच्या रात्री राहुन निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत करु शकता आणि सरत्या वर्षाला निरोप देऊ शकता.
अधिक वाचा
– मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी, वाचा एका क्लिकवर
– तुंग गावात हॅण्ड इन हॅण्ड आणि यू.एस.जी.आय संस्थांकडून ग्रीन व्हिलेज कार्यक्रम । PHOTO
– वडगाव भाजपाकडून स्वर्गीय पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा