वरसोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 7 वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावलेले महेंद्र नारायण एरंडे यांचा निरोप समारंभ आज (मंगळवार, दिनांक 27 जून) रोजी वरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहेत. सात वर्ष गावातील मुलांना ज्ञानदानाचे काम एरंडे सरांनी त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या सोबतीने केले, यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही कार्य केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एरंडे सर यांच्याच कार्यकाळात शाळेच्या इमारतीचे देखील काम झाले. त्यांच्या योगदाना बद्दल समारंभात सर्वांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेल्या नुतन मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एरंडे सरांनी मुलांना शालेय साहित्यांचे वाटप केले. ( farewell ceremony of varasoli school principal mahendra erande by villagers )
कार्यक्रमावेळी केंद्र प्रमुख सुहास विटे, वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच नलिनी खांडेभरड, सदस्य अरविंद बालगुडे, नारायण कुटे, रजनी कुटे, मंदा पाटेकर, मीना शिद, सीता ठोंबरे, राहुल सुतार, विजय महाडिक, माजी सरपंच सारिका खांडेभरड, माजी उपसरपंच दत्ता खांडेभरड, ग्रामस्थ राजू कुटे, सागर शिद यांच्यासह शिक्षक रविंद्र इथापे, नंदा गरड, तृप्ती गाडीलकर, पौर्णिमा ढमाले, सुवर्णा सपकाळ, अंगणवाडी सेविका श्रीमती मालती तारे, स्वाती पटेकर, मदतनीस नंदा खांडेभरड व ग्रामस्त उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्यांचे आयोजन, पाहा ठिकाण आणि तारीख
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट? पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 2 आरोपींना अटक । Kishor Aware Murder Case