मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील कांब्रे नामा गावातील तरुण शेतकरी श्रीकांत उर्फ भाऊसाहेब गणपत गायकवाड (वय 33) हा शेतात गवत काढायला गेला असता, तिथे विद्युतवाहिनी अंगावर पडल्याने विजेचा तीव्र झटका बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सहा महिन्याच्या आत मावळ तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभाराने दोन तरुण मृत पावले आहेत. काही दिवसांपूर्वीच पवनानगर भागात एका तरुण वीज कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
शेतकरी श्रीकांत गायकवाड हा नेहमीप्रमाणे शेतात गवत काढायला गेला होता. तेव्हा तिथे महावितरणची विज लाईन त्याच्या अंगावर पडली. विजेच्या प्रवाहाचा तीव्र झटका बसल्यावे सदर तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आज, शनिवारी (दिनांक 5 ऑगस्ट) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी श्रीकांत याच्या पश्चात त्याचे आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अशा आकस्मिक जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावावर देखील शोककळा पसरली आहे. ( farmer died after an electric line fell on him in maval taluka )
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती व्यवसायातून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. शेतात गवत काढताना अंगावर विद्युतवाहिनी पडली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जवळील एका आदिवासी व्यक्तीने सदरील घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तळेगाव इथे पाठवला. सदर प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.
सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली असून तरुण शेतकऱ्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. श्रीकांतला न्याय मिळवून देण्यासाठी गावकरी एकत्र आले आहेत. चिंचवड इथे छोटेमोठे काम करुन शेती करत कुटुंब चालवणाऱ्या तरुणाच्या जाण्याने कुटुंबाची झालेली हानी निघून येणारी नाही.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– इंद्रायणी विद्या मंदिर तळेगाव दाभाडे – ‘क्रीडांगणाच्या जागेत बांधकाम असल्यास तातडीने थांबवण्याचे आदेश…’
– खुशखबर! राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा
– ‘आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का?’, पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा, नाहीतर…