Dainik Maval News : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफुल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार असून सहभागी होण्यासाठी गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/…/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. विविध पिकांच्या पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार

