Dainik Maval News : इंदोरी येथील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पुणे रिंगरोड मार्गाकरिता मौजे इंदोरी येथील भूसंपादनाची परीगणना चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे शेतकरी बांधवांना कमी मोबदला मिळणार होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर क्षेत्रांची पुनर परीगणना करून बाकीच्या गावाप्रमाणे हंगामी बागायती जमिनीस जिरायत जमिनीच्या 1.5 पट व बागायती जमिनीस जिरायती जमिनीच्या 2.0 पट मोबदला मिळावा असे आदेश दिले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यामुळे इंदोरी गावातील बाधित शेतकऱ्यांना मोबदला स्विकारणाच्या ज्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या, त्यासंदर्भात मुदत वाढ मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, एमएसआरडीसीचे अभियंता यांची माजी मंत्री बाळा भेगडे यांनी भेट घेतली. रिंगरोड व्यवस्थापक समितीने शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे आश्वासन दिले असून आणि शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. ( farmers affected by pune ring road in Indori village maval to get increased compensation )
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, अरुण पानसरे, सूरज चव्हाण, शरद साळुंखे आणि शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी ! कमिशन मोबदला वाढवून देण्यास राज्य सरकार सकारात्मक
– लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जमा ; लवकरच राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान’
– रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने घेतला जगाचा निरोप, वडगाव येथील आदर्श शिक्षिका दीपाली गुजराथी यांचे निधन । Vadgaon Maval