Dainik Maval News : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुंग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे.
आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे. ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– आता शेतात पोहचणे झाले सोपे, मावळातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश । Maval Taluka