व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 29, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन तसेच विद्युत विषयक कामांबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी देहूरोड छावणी परिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. गीतांजली रावत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. आमदार शेळके यांनी नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेत प्रशासनास ठोस उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांना भौतिक सोयी–सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना वेळमर्यादा निश्चित करून काम पूर्ण करण्यास भाग पाडावे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

  • यावेळी रावत यांनी माहिती दिली की येत्या काही दिवसांत देहूरोड शहरात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांना शासकीय दाखले, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदानकार्ड तसेच विविध योजनांचा लाभ सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस विद्युत विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक, सार्वजनिक बांधकाम, महसूल, वन विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी अशोक आप्पा शेलार, प्रवीण झेंडे, रघुवीर शेलार, उमेश नायडू, बाळासाहेब जाधव, तानाजी काळभोर, कृष्णा दाभोळे, किशोर गाथाडे, आशिष बन्सल, नंदू काळोखे, संगिता (नानी) वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले.

नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करून शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याचा ठोस निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.


Previous Post

दिवसभर कडक उपवास आणि रानभाज्यांचा नैवद्य ; पवन मावळातील गावशिवारांत ऋषीपंचमीची खास परंपरा, नक्की वाचा

Next Post

शेतकऱ्यांना पिकांची ई-पिक पाहणी करुन घेण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
E-Peek-Pahani

शेतकऱ्यांना पिकांची ई-पिक पाहणी करुन घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.