लोणावळा शहराजवळ सोमवारी (दिनांक 2 जानेवारी) मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर सकाळच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तळेगाव दाभाडे येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले. दीपक अशोक नाटक (वय 27, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ( Fatal Accident On Mumbai Pune Expressway Near Lonavla City Youth From Talegaon Dabhade Killed On The Spot )
तर, राहुल कैलास जाधव (वय 28, रा. तुकारामनगर, पिंपरी), जालिंदर बापू पवार (वय 51, रा. खंडोबा माळ, आकुर्डी), रोहन भगवान वाघमारे (वय 28, रा. पिंपरी) हे तिघे जखमी झाले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी लोणावळ्यातील तुंगार्ली गावच्या हद्दीत मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारच्या (एमएच 14 जेएक्स 9385) चालकाचे भरधाव वेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर (आरजे 06 जीबी 7787) मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता. यात दीपक नाटक यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात किरकोळ वादातून पर्यटकांकडून तिघांना मारहाण, आठ जणांच्या विरोधात गुन्हा
– मोठी कारवाई! लोणावळ्यात वेश्याव्यवसाय प्रकरणी हॉटेलवर छापा, दोन महिलांची सुटका