व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परत येत असलेल्या बर्वे कुटुंबावर काळाचा घाला । Accident On Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दि. 30 एप्रिल) ईर्टीगा कारचा किलोमीटर 23 च्या दरम्यान भीषण अपघात झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 1, 2024
in महाराष्ट्र
car accident

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दि. 30 एप्रिल) ईर्टीगा कारचा किलोमीटर 23 च्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी झाले आहेत. एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवर हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार अनकंट्रोल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अपघातात कारचा (क्रमांक एमएच 05 बीएस 4170) चुरा झाला. अपघातामध्ये मनीषा बर्वे (वय 40 वर्षे रा. डोंबिवली) यांना गंभीर दुखापत होऊन त्या जागीच मयत झाल्या. तर सोनाली बर्वे (वय 35 वर्षे) आणि दिवेश बर्वे (वय 21 वर्षे डोंबिवली) यांना गंभीर दुखापती झाल्याने खाजगी वाहनाने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. तसेच अपघातामध्ये सुमन बर्वे (वय 68 वर्ष), चालक संदीप दिलीप बर्वे (वय 48 वर्ष), अश्वजीत बर्वे (वय 13 वर्ष) प्रणव बर्वे (वय 5 वर्ष) आदेश बर्वे (वय 3 वर्ष) अनिकेत बर्वे (वय 19 वर्ष) प्रिया बर्वे (वय 18 वर्ष) गौरव बर्वे (वय 17 वर्ष) कियारा बर्वे (वय 6 महिने) सर्व रा. डोंबिवली जि. ठाणे यांना किरकोळ स्वरूपाचा दुखापती झाल्या, त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनाने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आले.

सदर अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतूक सुरळीत चालू होती. सदर ठिकाणी पोनि/ गौरी मोरे मॅडम महामार्ग पोलीस पनवेल विभाग, खालापूर पोलीस ठाणे कडील अधिकारी व स्टाफ, म.पो.केंद्र पळस्पेकडील अधिकारी व स्टाफ, देवदुत टीम, आयआरबी कडील स्टाफ, अपघातग्रस्त मदत टीम इतर वाहन चालक उपस्थित होते. पुढील कारवाई खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. ( Fatal car accident on Mumbai-Pune Expressway woman died on the spot )

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट । Maval Lok Sabha
– मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News


Previous Post

मावळ लोकसभा : संजोग वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा जाहीर !

Next Post

वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
flag hoisting by MLA Sunil Shelke

वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.