मावळ विधानसभा मतदारसंघ ( Maval Taluka ) हा खेडापाड्यांचा मतदारसंघ असला तरीही, मतदारसंघात तळेगाव, वडगाव, लोणावळा, कामशेत, श्री क्षेत्र देहू यांसारखी मोठी मोठी शहरे देखील आहेत. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणच्या दाट लोकसंख्येच्या भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि परिसरातील जनतेच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुसज्ज अशी अग्निशमन यंत्रणा ( Fire Fighting System In Maval Taluka ) असावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मावळ विधानसभेत दोन ठिकाणी सुसज्ज अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. अग्निशमन आपत्कालीन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा योजनेअंतर्गत मावळ विधानसभेतील वडगाव नगरपंचायत ( Vadgaon ) आणि श्री क्षेत्र देहू नगरपंचायत ( Dehu Gaon Nagar Panchayat ) येथे अग्निशमन केंद्र इमारतीच्या बांधकामाकरिता आणि अग्निशमन वाहनांकरिता सुमारे 2 कोटी 56 लाख 69 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाढत्या शहरीकरणामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार !
अग्निशमन आपत्कालीन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा योजनेअंतर्गत मावळ विधानसभेतील वडगाव नगरपंचायत व श्री क्षेत्र देहू नगरपंचायत येथे अग्निशमन केंद्र इमारतीच्या pic.twitter.com/khuuBpyHUM— Sunil Shelke (@shelkesunilanna) September 9, 2022
यापैकी वडगाव नगरपंचायत ठिकाणी 1 कोटी 27 लाख 82 हजार आणि श्री क्षेत्र देहू नगरपंचायत ठिकाणी 1 कोटी 28 लाख 87 हजार रुपये निधीतून अत्याधुनिक सुसज्ज अशी अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ( Fire Fighting System Will Set Up At Vadgaon And Dehu Gaon Nagar Panchayat In Maval Taluka )
अधिक वाचा –
तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाची आमदार शेळकेंकडून पाहणी
बेबडओहोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ‘यांची’ निवड, निवडणूक बिनविरोध