Dainik Maval News : केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने येथील डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयात पाच दिवशी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक हेमंतकुमार डुंबरे यांनी मधमाशांची ओळख, त्यांच्या प्रजाती, मधमाशीच्या पेट्यांचे निरीक्षण करणे पेट्या हाताळताना घ्यावयाची काळजी, त्यांची संख्या वाढवणे, मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठीचे विविध टप्पे, युरोपियन, सातेरी मधमाशी आणि डंख रहित मधमाशी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
हंगामानुसार पेट्याचे त् नियोजन कसे करावे, मध कसा काढावा, शुद्ध आणि अशुद्ध मध कसे ओळखावे , मधमाशांपासून मिळणारी इतर उत्पादने, उदाहरणार्थ परागकण, प्रोपोलीस, रॉयल जेली, इत्यादी गोळा करण्याची पद्धती याबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
- बी पार्क अर्थात वर्षभर मधमाशांना आवश्यक फुलांची शेतीमध्ये नियोजन कसे करता येईल याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. हिमाचल प्रदेश येथील मधमाशी उद्योग करणाऱ्या तरुणांशी ऑनलाईन संवाद साधून मधमाशी पालन व्यवसायातील त्यांच्या अनुभव कथन करण्यात आले. मधमाशी पालन उद्योग सुरू करण्यासाठी असलेल्या संधी सरकारच्या विविध योजना, कर्जाची उपलब्धता इ विषय समजावून देण्यात आले.
शेतीला जोडधंदा म्हणूनही हा व्यवसाय कसा करता येईल, परागीभवन वाढवून आपल्या पिकांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबतीतही मार्गदर्शन करण्यात आली. प्रशिक्षणात सहभागी 92 विद्यार्थ्यांना खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी च्या कुलगुरू डॉ सायली गणकर, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुण्याच्या डायरेक्टर डॉक्टर किरण उईके, श्री राहुल काळे, प्रशिक्षण अधिकारी, डॉ जयवंत जाधव, प्राचार्य पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय उपस्थित होते.
कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रा पांडुरंग जगताप आणि प्रा निलम बांगर यांनी मार्गदर्शन आणि कष्ट घेतले. समारोपाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु गौरी ठेंबे, सिद्धी रणदिवे यांनी केले. आभार प्रदर्शन समृद्धी कांबळे यांनी केले.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News