Dainik Maval News : भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक रचनेत काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. यातील महत्वाचा बदल म्हणजे विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्ष पदाऐवजी आता मंडल अध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे. यात 100 बूथ मिळून एक मंडल अध्यक्ष अशी रचना करण्यात आली आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. पक्षाच्या या नवीन संघटनात्मक बदलानुसार मावळ तालुक्यामध्ये पाच मंडल तयार करण्यात आली आहेत.
मावळ तालुक्यामध्ये एकूण 402 बूथ असून त्यामधून हे पाच मंडळ निर्माण करण्यात आले आहेत. या नव्या रचनेनुसार मावळ तालुक्यात पवन मावळ मंडल, वडगाव-आंदर मावळ मंडल, तळेगाव दाभाडे-इंदोरी गण मंडल, देहू – देहूरोड मंडल आणि लोणावळा-कार्ला गण मंडल असे पाच मंडलांची निर्मिती करण्यात आली आहे.
पक्षाकडून या पाचही मंडल विभागात मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणचे मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.
मावळ भाजपात पवन मावळ मंडळ अध्यक्ष पदी दत्तात्रय माळी, वडगाव-आंदर मावळ मंडळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, तळेगाव दाभाडे -इंदोरी गण मंडळ अध्यक्ष पदी चिराग खांडगे, देहू-देहूरोड मंडळ अध्यक्ष पदी रघुवीर शेलार आणि लोणावळा – कार्ला गण मंडल अध्यक्ष पदी अनिल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षासमोरील प्रमुख आव्हान…
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाची मोठी वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच दुफळी माजली, सोबत पक्षातीलच अनेक दिग्गज नेते परस्परांविरोधात उभे ठाकले. यानंतर आता पुढे येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला आपली एकजूट दाखविण्याचे आणि गतवैभव परत मिळविण्याचे आव्हान असणार आहे. सोबत पक्षातील दुफळी लक्षात घेता सर्वांची मोट बांधून पक्षाला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी सर्वच नवनियुक्त मंडल अध्यक्षांना विशेष कष्ट घ्यावे लागणार आहे.
अधिक वाचा –
– ‘नूतन अभियांत्रिकी’ची माजी विद्यार्थिनी सोनल खांदवे-शिंदे बनली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी । Talegaon Dabhade
– लोणावळा येथील मोनिका झरेकर बनली क्लास वन अधिकारी ; MPSC मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड
– मावळची लेक बनली गटविकास अधिकारी ; एमपीएससी परीक्षेत केली चमकदार कामगिरी । Mayuri Jambhulkar-Bhegade