Dainik Maval News : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (दि. ६) पहाटे निधन झाले, ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काहीदिवसांपासून कलमाडी यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरेश कलमाडी यांनी त्यांच्या कार्यकाळात राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपदही भूषवले होते. याशिवाय ते प्रदीर्घ काळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून जात होते. शिवाय त्यांनी अल्पकाळ रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता.
राजकारणात येण्याआधी सुरेश कलमाडी हे १९६४ ते १९७२ या काळात भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कार्यरत होते. १९७४ साली ते सेवेतून निवृत्त झाले आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाले. तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
सन १९९५ ते १९९६ या काळात काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता. २०१० साली दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेवेळी सुरेश कलमाडी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. एप्रिल २०११ साली त्यांच्यावर दोषसिद्धीही झाली. यानंतरदेखील क्रीडा क्षेत्रात, विशेषत: ऑलिम्पिकशी संबंधित संघटनेमध्ये सुरेश कलमाडी यांचा प्रभाव पाहायला मिळत होता.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव एरंडवणेतील त्यांचे निवासस्थान ‘कलमाडी हाऊस’मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून साडेतीनच्या सुमारास नवी पेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे… pic.twitter.com/yHXWfonjmc
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2026
माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनानं पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
भारतीय हवाई… pic.twitter.com/6uxiuAvFwY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 6, 2026
माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक… pic.twitter.com/qZqRKY6guI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 6, 2026
राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजलीचा पूर :
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ, फडणवीस सरकारचा निर्णय
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
