उर्से गावात (ता. मावळ) दिवाळी निमित्त भव्य किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी यासासाठी अविनाश गायकवाड, धनंजय धामणकर, नवनाथ टेंभेकर, गणेश धामणकर, तुषार राऊत आदींनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) या स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्पर्धेत गावातील लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. यात एकूण 25 स्पर्धकांची नोंद झाली होती. मुलांनी अत्यंत सुबक आणि आकर्षक किल्ले साकारले होते. या 25 किल्ल्यांची परिक्षकांमार्फत 13 तारखेला पाहणी करण्यात आली. यावेळी तुषार राऊत यांच्या मार्फत 13 तारखेला प्रत्यक्ष किल्ले पाहणीवेळी प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर या 25 स्पर्धकांमधून एकूण 6 मुलांनी बनवलेले आकर्षक किल्ले बक्षिसास पात्र ठरले. त्यात प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे तिन्ही क्रमांक प्रत्येकी 2-2 स्पर्धकांत विभागून देण्यात आले.
अविनाश गायकवाड यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षिस रुपये 5000, धनंजय धामणकर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे बक्षिस रुपये 3000 आणि नवनाथ टेंभेकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचे बक्षिस रुपये 2000 अशी रक्कम आणि प्रत्येक विजेत्याला आकर्षक ट्रॉफी अशी बक्षिसे वाटप करण्यात आली. पर्यावरण पुरक किल्ला, माहिती देणारे फलक, हुबेहुब प्रतिकृती साकारणे अशा कसोट्यांवर हि स्पर्धा पार पडली.
बक्षिस वितरणावेळी अविनाश गायकवाड, धनंजय धामणकर, नवनाथ टेंभेकर, गणेश धामणकर, तुषार राऊत, वैभव धामणकर, देविदास धामणकर, कालिदास दातखिळे आदी आयोजन मान्यवर आणि उर्से गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Fort Build Competition For Childrens at Urse Village Maval Cash Prizes To Participants )
अधिक वाचा –
– शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन : सोमाटणे फाटा इथे शिवसेना ठाकरे गटाकडून रुग्णांना फळे वाटप
– ‘महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा’, राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र । Pune News
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर