आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातून निगडे इथे तलाठी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवार (दिनांक दिनांक 30 मे) करण्यात आला. या या कामासाठी एकूण 20 लक्ष 35 हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या कार्यालयाच्या इमारतीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी कार्यालय स्वतंत्र असणे गरजेचे होते. हीच गरज ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी निधी उपलब्ध केला.या कार्यालयामुळे नागरिकांसाठी तलाठी देखील वेळेवर उपलब्ध होतील.” – भिकाजी भागवत सरपंच निगडे.
ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांची कामे ही तलाठी कार्यालयाशी संबंधित असतात. तलाठी हा शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असतो. शेतजमिनी संबंधित अभिलेख अद्ययावत रहावेत. तसेच विविध नोंदणी, दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. तलाठी कार्यालयाचे कामकाज अपुऱ्या जागेमध्ये करावे लागत होते. त्यामुळे निगडे, कल्हाट, कशाळ, भोयरे, पवळेवाडी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. निगडे गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थायिक स्वरुपात सुसज्ज कार्यालय झाल्यानंतर सामान्य नागरिकांसह कर्मचारी वर्गाचेही कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. ( foundation laying of new building of talathi office at nigde maval taluka )
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बंडू घोजगे, निगडे उपसरपंच गणेश भांगरे, आंबळे सरपंच मोहन घोलप, माजी सरपंच बळीराम भोईरकर, विठ्ठल जाधव, देविदास भांगरे, सविता भांगरे, तलाठी जाधव, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, बाबाजी गायकवाड, दत्तात्रय पडवळ, चेअरमन संतोष करवंदे, माणिक तांबोळी, बाबाजी येवले, योगेश थरकुडे,सोपान ठाकर, सीताराम ठाकर,घमादादा ठाकर आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली, सुधारित आदेशात ‘या’ ठिकाणी पदस्थापना
– भोयरे गावातील अंतर्गत रस्ते विकास कामाला सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध