पाचाणे : पवन मावळातील रस्त्यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. बुधवार (दिनांक 17 मे) रोजी या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. ( four and half crores fund for road construction in pawan maval through mla sunil shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष रस्ते दुरुस्ती योजनेअंतर्गत मौजे कासारसाई–पाचाणे- पुसाणे- ओव्हळे प्रजिमा 157 किमी 0/00 ते 3/00 किमी 10/00 ते 10/500 व किमी 13/700 ते 20/00 रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार असून यामध्ये पाचाणे फाटा ते डोणे फाटा येथील सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. आधी अरुंद असलेला 3.75 मीटर रस्ता तो आता रुंद करून 5.50 (साडेपाच) मीटर असा होणार असून साईडपट्ट्यांचे देखील काम करण्यात येणार आहे.
अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता प्रशस्त होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या भूमिपूजन समारंभ प्रसंगी मा सरपंच मनोज येवले, सुभाष येवले, अशोक साठे, मा तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मराठे, अक्षय महाराज येवले, श्रीकांत जाधव, मा उपसरपंच सोमनाथ इंगळे, युवक अध्यक्ष काँग्रेस राजेश वाघोले, दशरथ येवले, संदिप भालेराव, अरुण रेणुसे, विकास गायकवाड, विठ्ठल येवले, युवराज केदारी, उमेश केदारी, अमोल सावळे, दिनेश गायकवाड, संजय शेडगे, गोरख येवले, निलेश येवले, दादू भालेसैन, केशव झेंडे, सोमनाथ शिंदे, लक्ष्मण येवले, छबुराव कडू, शांताराम वाघोले, राजू साठे, भरत वाजे, शिवाजी वाजे, निलेश रावडे, मयुर येवले आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन; दोषींवर कठोर कारवाईची कुटुंबीयांची मागणी । Kishor Aware Murder Case
– ‘खरं हाती येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं..’, आमदार शेळकेंसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरेंची भावूक पोस्ट, वाचा सविस्तर