व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आरपीआय वाहतूक आघाडी संलग्न ‘कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टँड’चे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन महाराष्ट्र अध्यक्ष दक्षिण भारतीय बीजेपी राजेश आण्णा पिल्ले यांचे हस्ते करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 17, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Inauguration-of-Rickshaw-Stand

Photo Courtesy : Shashikant Belhekar


पिंपरी शहरातील अजमेरा, मासुळकर कॉलनी येथील आय हॉस्पिटल समोरील कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन महाराष्ट्र अध्यक्ष दक्षिण भारतीय बीजेपी राजेश आण्णा पिल्ले यांचे हस्ते करण्यात आले.

सदर स्टँडमुळे येणाऱ्या रुग्ण आणि सामान्यांना चांगली सुविधा मिळणार आहे. एकावेळी सुमारे 10 रिक्षा या स्टँडवर उभ्या राहू शकतात. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. माता हिराबाई किसन लांडगे यांच्या नावाने हे रिक्षा स्टँड सुरू करण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राजेश पिल्ले यांनी आपल्या भाषणात, भविष्यकाळात रिक्षाचालकांच्या ज्या काही समस्या, अडचणी, व्यावसायिक मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले. तसेच, रिक्षा चालक हे आपला व्यवसाय करत असताना फार मोठी सामाजिक जबाबदारी निभावत असतात. 24 तास नागरिकांना सेवा देण्याचे महत्त्वाचे कार्य रिक्षा चालक बांधव करत असतात. त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी पूर्ण ताकदीनिशी करण्यासाठी तयार आहे असे आश्वासन दिले.

आरपीआय (अ) वाहतुक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी रिक्षा चालकांच्या दैनंदिन जीवनातील व व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मदत करण्यास तयार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपीआय (अ) वाहतुक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीजभाई शेख व कै.माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॕन्ड अध्यक्ष ईकबालभाई शेख यांनी कोरोना कालावधीत रिक्षाचालकांना केलेल्या अन्नधान्य वाटपाची सविस्तर माहिती यावेळी सांगितली.

त्याचप्रमाणे ओला उबेर रॅपिडो यांच्या विरोधात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील लढाई जिंकल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली. कोर्टाच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडीने ओला उबेर रॅपिडो या बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या पुंजीपती कंपन्यांच्या वर बंदी घालण्यास यशस्वी झाले. आता पुढील कालावधीत रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी भाडे नाकारू नये, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, प्रवासी हेच आपले दैवत असून त्यांच्या अडीअडचणीला सुद्धा धावून जावे व रिक्षा स्टॅन्ड हे नागरिकांच्या साठी एक मदत केंद्र असावे अशा भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा – वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्रांकडून रानमांजराला जीवदान । Navalakh Umbare

उद्घाटन कार्यक्रमासाठी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष ईकबालभाई शेख व उपाध्यक्ष गोविंद पवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम आयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमास मा नगरसेवक राजेश पिल्ले, मा शिक्षण मंडळ सभापती अर्जुन ठाकरे, शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक गणेश जाधव, बीजेपी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष फारुख भाई इनामदार, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम साळवी, विद्यासागर गायकवाड व संगीत कट्टा प्रमुख शरद चव्हाण व रिक्षा स्टँडचे अध्यक्ष इकबाल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी
– आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार 25 हजार रुपये मानधन, शिंदे सरकारचा निर्णय!!


dainik maval jahirat

Previous Post

वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्रांकडून रानमांजराला जीवदान । Navalakh Umbare

Next Post

पवन मावळमधील रस्त्यासाठी आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून साडेचार कोटींचा निधी; मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
road-construction-bhumi-pujan

पवन मावळमधील रस्त्यासाठी आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून साडेचार कोटींचा निधी; मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.