Dainik Maval News : दोन वर्षापूर्वी सुरु केलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेतून चार विद्यार्थी अभ्यास करून शासकीय सेवेत वरिष्ठ पदावर रुजू झाल्याने नगर परिषदेकडून मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सदर विद्यार्थ्यांचा नगर परिषद कक्षात सत्कार केला.
राज्य व केंद्र शासनाच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी तळेगाव दाभाडे परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शासनाच्या उच्य पदावर अधिकारी म्हणून काम करण्याच्या उद्येशाने दोन वर्षापूर्वी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सुरु केलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी अभ्यास करून शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.
- नगर परिषदे कडून या अभ्यासिकेसाठी पुस्तके, संगणक, ऑनलाईन क्लासेस आदी बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येनी विद्यार्थी याचा फायदा घेत आहे, तसेच नगर परिषदेच्या शाळामधून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी नगर परिषदेतील वरिष्ठ अधिका-या कडून विद्यार्थ्यांचे क्लास देखील सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.
शासकीय सेवेत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –
राजू असवले, मनीष कुडे, अर्चना जाधव या तिघांची महसूल सहाय्यक म्हणून
तर, वैष्णवी यादव यांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक