Dainik Maval News : लोणावळा शहरातील प्रधान पार्क येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या ‘ओम श्री’ बंगल्यावर २७ मे रोजी पहाटे २.५१ वाजता २० ते २२ अनोळखी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत ११.५० लाख रुपयांचा ऐवज लुटला. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांतील डॉ. खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोड्याचा प्रयत्न आहे, ज्यात दोन वेळा दरोडेखोरांना यश मिळाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दरोडेखोरांनी लोखंडी ग्रीलसह जवळपास पाच ते सहा दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी सर्वात आधी बंगल्याच्या वॉचमन आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून दोरीने बांधले. त्यानंतर डॉ. खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला हातपाय बांधून, तलवार, कुकरी, दांडके दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोन्याचे, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११.५० लाख रुपयांचा ऐवज लुटला.
हा दरोडा सुरू असताना, डॉ. खंडेलवाल यांच्या पुतण्याने लोणावळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बंगल्यातून बाहेर पडलेले दरोडेखोर आणि पोलिसांची गाडी यांच्यात फक्त ५ ते १० फुटांचे अंतर होते. पोलिसांनी काही अंतर दरोडेखोरांचा पाठलागही केला, परंतु एकही दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला नाही. स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणा आणि निष्क्रियतेचा आरोप केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन