मावळ तालुका नवनिर्माण प्रतिष्ठान आणि तळेगाव व्यासपीठ महिला मंच, तळेगाव दाभाडे, सीबीआरटीआय, पुणे व तळेगाव दाभाडे नगरपरिषद आयोजित ‘मानव व मधमाशी- महत्त्व व फायदे!’ या माहिती सत्राचे रविवार, दिनांक 19 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. ( Free Beekeeping Training Camp Completed In Talegaon Dabhade Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रसंगी प्रा हेमंतकुमार डुंबरे (मास्टर ट्रेनर सीबीआरटीआय, पुणे) हे सांगताना म्हणाले की, ‘मानवाच्या पृथ्वीवरील राहण्यासाठी मधमाशी खूप महत्त्वाचा भाग आहे. परागीभवनामध्ये मधमाशा खूप मोठ्या प्रमाणात काम करून अन्न तयार करतात. ते अन्न मानव खातो आणि जगतो. सध्याच्या काळामध्ये मधमाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. तिला वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. मधमाशी कडून मानवाने जिद्द, संगठन, एकाग्रता हे गुण शिकले पाहिजेत.’
शिबिराच्या उदघाटन प्रसंगी श्री कारके म्हणाले की, ‘प्रत्येक शेतकऱ्याने मधमाशी पालन करून स्वतः च्या शेतीच्या उत्पादनात भरीव अशी वाढ करून घ्यावी.’ सुधाकर मोरे म्हणाले की, ‘मधमाशी जशी भल्या पहाटे उठून कामाला लागते, तसे सगळ्यांनी लवकर उठावे व कामाला लागावे.’
कार्यक्रमामध्ये प्रा डुंबरे यांनी मधमाशीच्या पोळ्याची रचना, त्यातील राणीमाशी, कामकरी माशी आणि नर माशी यांची कामे करण्याची पद्धती, कामकरी माशा षटकोनी पोळेच का तयार करतात, कामकरी माशा फुलांमधील मकरंद आणून मध कसे तयार करतात, त्या मधाचे आपल्या मानवाला होणारे फायदे, मानवाने जंगल, गुहा, किल्ले इत्यादी ठिकाणी जाताना कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भामध्ये पीपीटी मार्फत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजक म्हणून सचिन भांडवलकर आणि रेणुका भांडवलकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उद्घाटक कृष्णा गजानन कारके होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर भिमराव मोरे हे होते. संयोजक डॉ गणेश सोरटे यांनी काम पाहिले.
अधिक वाचा –
– सावधान, तो परत येतोय! महाराष्ट्रात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय, मुंबई-पुणे भागात परिस्थिती चिंताजनक
– तळेगाव दाभाडेतील पिंकेथॉन रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या उपस्थितीत मॅरेथॉनचे उद्घाटन