इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या मार्फत सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्या शाळा क्रमांक 4 येथे विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. रविवारी (दि. 24 फेब्रुवारी) या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात आणि डॉ. वर्षा वाढोकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नेत्रतज्ञ डॉ. संजाली वाढोकर यांनी आणि पवना हॉस्पिटल सोमाटणे यांच्या स्टाफने इयत्ता 8वी ते 10वी मधील 100 विद्यार्थिनींची नेत्र तपासणी केली. यावेळी डॉ. कोमल सरोदे, सिस्टर वर्षा वाघमारे, मेडिकल स्टुडंट्स बलजित कौर लढ्ढा, अश्विनी मोरे आणि सचिव निशा पवार यांचे सहकार्य लाभले. डॉ. संजाली वाढोकर आणि वर्षा वाढोकर यांनी विद्यार्थिनींना डोळ्यांची निगा कशी राखावी, याबद्दल मार्गदर्शन केले. (Free eye Check up of 100 students in Talegaon Dabhade by Inner Wheel Club)
‘मुलींनी स्क्रीन टाईम कटाक्षाने कमी केला पाहिजे. दिवसातून दोन तीनदा डोळे थंड पाण्याने धुतले पाहिजेत. शिवाय जोरजोरात कधीही डोळे चोळू नयेत.’ – डॉ. संजाली वाढोकर
अधिक वाचा –
– अमृत भारत योजनेअंतर्गत लोणावळा, चिंचवड आणि देहूरोड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन
– मोठी कारवाई! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त
– ‘या’ वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना ‘घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार – मुख्य निवडणूक अधिकारी