Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांच्या सहकार्याने व शिव विद्या प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आर.सी.सी. ब्राम्हणोली यांनी वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष अभय देवरे व अभय मायदेव, श्रीकांत पाटणकर, विनायक गायकवाड, रेणुका पंडीत उपस्थित होते.
एकूण १०८ ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी केली. तर १०२ ग्रामस्थांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. रुग्णांना औषधे, गोळ्या व गरजेनुसार चष्मे वाटप करण्यात आले. तसेच डोळ्यांची आवश्य शस्त्रक्रीया करण्याची गरज असणाऱ्या ग्रामस्थांसाठी मोफत शस्त्रक्रीयेची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रसंगी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया चे नितीन दळवी व एच.व्ही.देसाई हॉस्पिटलचे निखिल देसाई, शिव विद्या प्रतिष्ठानचे संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर, संतोष वंजारी हेही उपस्थित होते.
आर.सी.सी. ब्राम्हणोलीचे अध्यक्ष योगेश काळे, सदस्य अंकुश काळे, विशाल मोरे, शंकर काळे, संदिप काळे, कविता काळे, आशा वर्कर वैशाली पवार, जि.प. शाळा शिक्षक एस.एस. ठाकर, ग्रामस्थ नवनाथ काळे, सरपंच निलम साठे यांनी शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime
– मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News
– जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव