व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनकडून कोथूर्णे इथे आदिवासी समाजातील 50 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल कीटचे वाटप

संविधानाने सर्वांनाच शिक्षणाच्या मूलभूत अधिकार सोपवला. परंतू मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अत्यंत कठीण जातं.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 24, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
free-school-kits

Photo Courtesy : Spandan Foundation


मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या कोथूर्णे गावातील वाघजाई वस्ती आणि चिंचवाडी इथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील कातकरी समाजातील आदिवासी मुलांना आणि अन्य काही विद्यार्थी अशा एकूण 50 विद्यार्थ्यांंना ‘खुशी के रंग’ फाऊंडेशन आणि ‘स्पंदन’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. ह्या कीटमध्ये स्कूल बॅग, 4 वह्या, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाउच इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. ( free school kits were distributed to 50 tribal students at Kothurne by Spandan and Khushi Ke Rang Foundation )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संविधानाने सर्वांनाच शिक्षणाच्या मूलभूत अधिकार सोपवला. परंतू मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अत्यंत कठीण जातं. अशातच शालेय साहित्यांसाठी संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडे पैसे नसतात. त्यामुळे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही मोलाची मदत करण्यात आली. “शिक्षणविषयक जनजागृती नसल्याने आदिवासी कातकरी मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. परंतु या मुलांना अशा विविध संस्थानी वेळोवेवेळी मदतीचा हात दिल्यास या मुलांमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण होईल,” असे मत शाळेचे मुख्याध्यापक नितीन वाघमारे यांनी व्यक्त केले.

खुशी के रंग फाऊंडेशन मार्फत राज्यभर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अशाप्रकारची मदत करण्याचे काम गेली 8 वर्षे अविरतपणे सुरू आहे. आम्हाला भविष्यात अनेक ए. पी. जे. अब्दुल कलाम घडवायचे आहेत आणि म्हणुनच त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ‘एक कदम कलम से कलाम की ओर’ असा उपक्रम हाती घेतल्याचे खुशी के रंग फाऊंडेशनचे निलेश शिंगे यांनी यांनी सांगितले.

आदिवासी मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून सर्वांनी योग्य ठिकाणी मदत झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी निलेश शिंगे, श्रद्धा अहिरराव (राजगुरु), राजेंद्र राजगुरू, स्पंदन फांउडेशन चे संस्थापक धर्मेंद्र ठाकर, मुख्याध्यापक नितीन वाघमारे, मधुकर दळवी, आणि अंगणवाडी सेविका सुनंदा निंबळे आदि उपस्थित होते. ( free school kits were distributed to 50 tribal students at Kothurne by Spandan and Khushi Ke Rang Foundation )

अधिक वाचा –
– व्वाह पोराहो…शाब्बास!! शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत भोयरे शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश
– लोणावळ्यात चोरीच्या घटनेतील आरोपी 12 तासात गजाआड; शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर घाटात दरड कोसळली! तब्बल साडेतीन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद

Next Post

‘पसायदान विश्व दीप कृती समिती’च्या अध्यक्षपदी भास्करराव म्हाळसकर, काय आहे ही समिती? जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pasaydan-Pune

'पसायदान विश्व दीप कृती समिती'च्या अध्यक्षपदी भास्करराव म्हाळसकर, काय आहे ही समिती? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.