संविधान दिनाचे औचित्य साधून पर्यटन विभागाकडून शनिवारी 3 डिसेंबरसह 7 आणि 8 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कीट टूर आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागीय पर्यटन कार्यालयाकडून मोफत सहल, बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ( Free Tours And Bus Services For Three Days Starting December 3 From Department Of Tourism )
या टूर सर्किटमध्ये सिम्बॉयसिस महविद्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व मेमोरियल, आगाखान पॅलेस आणि तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान ( Dr Babasaheb Ambedkar Residence Talegaon Dabhade ) या स्थळांचा समावेश आहे. या सहलीत सहभागी होणारे पर्यटक, नागरिकांना पर्यटन विभागामार्फत गाईड, चहा व अल्पोपाहार या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ऑपरेशनल एक्झेक्युटिव्ह अजयकुमार कुलकर्णी – भ्रमणध्वनी क्र. 8080035134 यांच्याशी संपर्क साधावा. या मोफत सहलीचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक श्रीमती सुप्रिया करमरकर – दातार यांनी केले आहे. ( Free Tours And Bus Services For Three Days Starting December 3 From Department Of Tourism )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला आणखीन एक झटका! खादी ग्रामोद्योग पाठोपाठ खरेदी-विक्री संघावरही भाजपचा कब्जा
– मावळ भाजपाचे नूतन कार्यालय तालुक्यात विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे ठरेल – माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे