भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पुर्ण भारतभर, भारताचा सांस्कृतिक वारसा, शारिरीक स्वास्थ्य, ई. बाबतचा प्रचार करण्यासाठी भ्रमंती करणार आहेत. सदर बाईकर्स दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातून प्रवास करणार आहेत. एकुण 75 दिवसांचा हा प्रवास असून देशातील 34 राज्यातून 21,000 किलोमीटर प्रवास हे 75 बाईकर्स करणार आहेत. ( Freedom Rider Bike Rally )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रायगड जिल्ह्यातून त्यांचा प्रवास दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे ते मुंबई असा जुना पुणे-मुंबई हायवे मार्गाने होणार असून सदर फ्रिडम रायडर बाईकर्स रॅलीचे स्वागत डॉ महेंद्र कल्याणकर (जिल्हाधिकारी, रायगड) यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे होणार आहे. या स्वागत कार्यक्रमावेळी खेलो इंडिया कुस्ती केंद्राचे कुस्तीगीर आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
खोपोलीपासून पुढे हे बाईकर्स ठाणे जिल्ह्याकडे प्रवास करणार आहेत. खोपोली ते खारघर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड त्यांचे सोबत असतील. या बाईकर्स करिता आपल्या क्षेत्रातून पुढे प्रवासाच्या वेळी पोलिस संरक्षण (पोलिस एस्कॉर्ट वाहन ई) आणि रुग्णवाहिका ई बाबत सुविधा पुरवण्याबाबत डॉ महेंद्र कल्याणकर यांनी संबंधीत यंत्रणेला सुचना दिल्या आहेत.
अधिक वाचा –
– पं. नेहरुंमुळेच टिकला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा ! – श्रीरंजन आवटे
– वडगाव शहरातील ‘या’ भागाला मिळाली नवी ओळख, पाहा जागेचे नवीन नामकरण काय? I Vadgaon Maval