व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पं. नेहरुंमुळेच टिकला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा ! – श्रीरंजन आवटे

‘संविधानिक राष्ट्रवाद मंचा’च्या वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान आणि विश्वनेते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जन्मदिनानिमित्त रविवार, 13 नोव्हेंबर रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 14, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र
Constitutional-Nationalism-Forum

Photo Courtesy : Deepak Bidkar


‘संविधानिक राष्ट्रवाद मंचा’च्या वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान आणि विश्वनेते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जन्मदिनानिमित्त रविवार, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी आयोजित ‘ सोहळा पंडित नेहरूंच्या विचाराचा ‘ या प्रा. श्रीरंजन आवटे यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्याख्यान एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे झाले.

या व्याख्यानामधून पंडितजींचे विचारविश्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या काही महत्त्वाच्या परिमाणांचा वेध घेण्याचा प्रयत्न श्रीरंजन आवटे यांनी केला. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन हे होते. व्यासपीठावर अरुणा तिवारी, प्रसाद झावरे, प्रशांत कोठडिया उपस्थित होते. महावीर जोंधळे, अंजली चिपलकट्टी, डॉ. प्रदीप आवटे, जांबुवंत मनोहर यांच्यासहीत अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते. ( Jawaharlal Nehru Jayanti 2022 Lecture In Pune City Organize By Constitutional Nationalism Forum )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 रोजी, सायंकाळी 6 वाजता याच विषयावरील पुढील व्याख्यान होणार आहे. या दुसऱ्या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख आणि इतिहास तज्ञ डॉ. प्रा. श्रद्धा कुंभोजकर हे भुषवणार आहेत.

श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘पंतप्रधान,धोरणकर्ता, विश्वनेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला. स्वातंत्र्यपूर्व भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत यांना जोडणारी भारत जोडो यात्राच जणू नेहरू यांनी काढली. नेहरूंना यांना समजावून घेणे म्हणजे भारताच्या, आपल्या मुळांचा शोध घेणे होय. नेहरू हेच गांधीजींचे राजकीय वारस आहेत, विनोबा भावे हे त्यांचे अध्यात्मिक वारस आहेत. ‘फॅसिझम आणि साम्राज्यवादाचे त्यांचे आकलन महत्वपूर्ण होते. नेहरूंनी वैश्विक भानातून नवराजकारण भारतात घडवलं. स्वातंत्र्य मिळविण्याआधीच विभूतीपूजेपासून सावध केले. पं. नेहरूंच्या प्रचंड योगदानानंतरही त्यांच्या पश्चात देशाने आणि काँग्रेसनेही पं. नेहरूंकडे दुर्लक्ष केले, हे दुर्देव आहे’.

हेही वाचा – व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा

‘नेहरू हे धर्मद्वेष्टे नव्हते पण, ते धर्मांधतेवर उत्तर शोधत होते. धर्मनिरपक्षतेची मूलभूत चौकट आपण स्विकारली आहे, याचे भान त्यांना सतत होते.टीका ऐकून घेण्याची त्यांची तयारी होती. दंगलींनी जवळपास बेचिराख झालेल्या देशाची सूत्र हातात घेताना आणि नंतर ब्रिटिशांच्या नावाने खडे फोडत न बसता नवी रचना त्यांनी उभी करून दाखवली. स्वतंत्र भारतात सर्वांना मताधिकार दिला, ही ऐतिहासिक गोष्ट आहे,’ असेही प्रा. आवटे म्हणाले.

प्रशांत कोठडिया म्हणाले, ‘नेहरूंना ,गांधींना टाळता येणार नाही. पं. नेहरूंना कधीही आपण विश्वगुरु असल्याची जाहिरात केली नाही, तरी त्यांना विश्वनेता म्हणून मान्यता मिळाली, कारण त्यांनी मूलभूत योगदान दिले’.

अधिक वाचा –

– हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा तळेगाव दाभाडेत भाजपाकडून निषेध
– ‘राजकारणातला गद्दार…अब्दुल सत्तार’, मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कवितेचा व्हिडिओ व्हायरल


dainik maval jahirat

Previous Post

Video : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अनेक प्रवासी जखमी

Next Post

लोणावळा एअरफोर्स परिसरात विनापरवाना ड्रोनद्वारे शूटींग, गुन्हा दाखल I Lonavla Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Drones

लोणावळा एअरफोर्स परिसरात विनापरवाना ड्रोनद्वारे शूटींग, गुन्हा दाखल I Lonavla Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.