Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत चे प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपाचे नगरसेवक रोहित मंगेश धडवले हे नगरसेवक पदासाठी अपात्र ठरले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला. त्यामुळे धडवले यांचे नगरसेवक पद रद्द होणार असून भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
नगरसेवक रोहित धडवले यांच्या विरोधात अंकुश किसन तुमकर व गणेश अंकुश तुमकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केले होते. या अपीलावर सुनावणी होऊन बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डूडी यांनी आदेश दिला आहे.
वडगाव नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी झाली, तर निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी लागला होता. या निवडणुकीत भाजपने रोहित धडवले या तरुण उमेदवाराला प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक प्रभाग असलेल्या या प्रभागातून धडवले यांनी अनपेक्षित विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला होता.
दरम्यान अंकुश तुमकर व गणेश तुमकर यांनी धडवले यांच्या विरोधात त्यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केले बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी रोहित धडवले यांना नगरसेवक पदी राहण्यास अपात्र ठरवले आहे.
निवडणूक झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्याआधीच म्हणजे अवघ्या दहा महिन्यात नगरसेवक पद रद्द झाल्याने धडवले यांच्यासह भाजपच्या दृष्टीने हा एक प्रकारे धक्का ठरला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!
– वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त
– घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू
– दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक


