Dainik Maval News : अतिप्रमाणात दारू प्यायल्याने एकाचा मृत्यू झाला. मित्रांमध्ये लागलेल्या पैजेतून हा प्रकार घडला. मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रामकुमार साह असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस उपनिरिक्षक दिपक रंजनराव खरात (तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी १. कृष्णा सिंह (वय ३५ वर्षे, सध्या रा. भाडेतत्तावर नवलाख उंबरे, ता. मावळ., मूळ राह. घोरडीहा ता. करगहर जि.रोहतास, बिहार) आणि २. विकासकुमार ( पुर्णनाव पत्ता माहित नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक एक अटकेत आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०५, २३८, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी तीन वाजताच्या सुमारास नवलाख उंब्रे गावचे हद्दीत ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मयत रामकुमार साह यास पैज लावुन दारू अतिजास्त प्रमाणात एकाच वेळी पिण्यास भाग पाडले. यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीत त्यास वैद्यकीय उपचार न दिल्याने त्याचे मृत्युस कारणीभुत झाले आणि प्रेताची विल्हेवाट लावुन पुरावा नष्ट केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक रेळेकर हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक


