Dainik Maval News : एमडी ड्रग्स व गांजा यांचा व्यवसाय करणाऱ्या एका फरारी आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे. राकेश उर्फ डॅनी रविंद्र हान्सारे (रा. कैलासनगर, लोणावळा, ता मावळ, जि पुणे) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून गुन्हा रजिस्टर कलम- 323/2024 एनडीपीएस 21 (ब), 8 (क) या अंतर्गत पोलिसांना तो हवा होता.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना राकेश उर्फ डॅनी रविंद्र हान्सारे हा आरोपी वलवन डबल गेट याठिकाणी आलेला आहे, अशी खात्रीलायक माहीती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. यानंतर त्यास पुढील तपास कामी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मावळ राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पो. नि. सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. संतोष जाधव, पो.उप.नि.अभिजित सावंत, पो. हवा. राहुल पवार, पो. शि. नामदास, रईस मुलाणी, रमेश उगले यांनी वरील कारवाई केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News