वडगाव मावळ येथील सुप्रसिध्द निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गणेश दामोदर बुचडे-पाटील यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. मंडळाची सर्वसाधारण बैठक माजी अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी बुचडे-पाटील यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली, तसेच अन्य पदाधिकारीही एकमताने निवडण्यात आले. ( Ganesh Buchde Patil Re-Elected President of Vadgaon Maval Nimbalkar Talim Ganeshotsav Mandal )
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष पदी राहुल शरदराव कटके, खजिनदार म्हणून अशोक गणपतराव कोंढाळकर, कार्याध्यक्ष पदी बापुसाहेब मानकर, केदार बोराडे आदींची निवड कऱण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दिव्यांग आणि अंधांसाठी चालविल्या जाणाऱ्या सामाजिक संस्थांना धान्य, कपडे याची मदत, दिवाळीत सामाजिक संस्थांसाठी फटाके वाटप, वारकऱ्यांना भोजन, गरजूंना वेळोवेळी आर्थिक मदत असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे अध्यक्ष बुचडे-पाटील यांनी बैठकीत सांगितले.
उत्सव काळात श्रीं ची विधिवत प्राणप्रतिष्ठा, गणेश याग, अथर्वशीर्ष पठण, भजन, सत्यनारायण पूजा असे धार्मिक कार्यक्रम होतील. परंपरेप्रमाणे सजवलेल्या रथातून श्रीं ची विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. यंदा उत्सव काळात गंगावतरणाचा भव्य हालता देखावा सादर केला जाणार आहे, असेही बुचडे-पाटील यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात 80 टक्के भात लागवडी पूर्ण; पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांचीही लवकरच ‘वाढऔंज’
– अरे व्वाह..! गणेश मूर्तीकारांचे हजार रुपये वाचणार, कसं काय बरं? वाचा संपूर्ण बातमी
– ‘महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे सौभाग्य’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी