मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे 80 टक्के भात रोपाच्या लागवडी झाल्या आहेत. पाऊस असाच चालू राहिला तर पुढील आठ ते दहा दिवसात भात लागवडी पुर्ण होतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली. मावळ तालुक्यात भात लागवड क्षेत्र 13500 हे आहे. त्यापैकी आतापर्यंत 10800 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पुर्ण झाली आहे. ( 80 percent paddy cultivation is complete in Maval Taluka )
ह्यावर्षीचा मावळ तालुक्यात खरीप हंगाम दरवर्षीपेक्षा उशिराने सुरु झाला. मान्सूनचे आगमनच जूनच्या अखेरीस झाल्याने भातरोपवाटिका तयार करण्याच्या कामाला देखील विलंबाने सुरुवात झाली. पावसाने जून महिन्यात खंड दिल्याने भातरोपे पुनरलागवडीसाठी उशिरा तयार झाली. पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झाल्यानंतर भात रोपाची पुनरलागवड करायला सुरुवात झाली. भात लागवडी चालू झाल्या नंतर पाऊस अखंडपणे चालू असल्याने भात लागवड अंतिम टप्प्यात आहेत.
मावळ तालुक्यात ह्यावर्षी खरीप हंगाम नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले होते. शेतकऱ्यांसाठी गावोगावी प्रशिक्षण, मेळावे, बिजप्रक्रिया मोहीम, चारसूत्री एसआरटी भात लागवड मार्गदर्शन करण्यात आले होते. मावळ तालुक्यात भात लागवड क्षेत्र 13500 हे आहे. त्यापैकी आतापर्यंत 10800 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पुर्ण झाली आहे. मावळ तालुक्यात पवनमावळ, नाणे मावळ, आंदरमावळ भागात भात लागवडी पुढील आठ ते दहा दिवसात पुर्ण होतील. मावळ तालुक्यात चारसूत्री पद्धतीने 4500 हे. , एस.आर.टी. पद्धतीने 200 हे. , यांत्रिकीकरण 50 हे. , पट्टा पद्धत 25 हे. क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने भात लागवड होते. ( 80 percent paddy cultivation is complete in Maval Taluka )
‘खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यासाठी भातपीक मार्गदर्शन प्रशिक्षण व मेळावे घेण्यात आले होते. बिजप्रक्रिया मोहीम राबविण्यात आली. चारसूत्री, एसआरटी पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. मावळ तालुक्यात चारसूत्री भात लागवड क्षेत्र वाढले आहे.” – विकास गोसावी (कृषि सहाय्यक, शिळींब गाव, पवनमावळ)
टीप – वाढऔंज हा शब्दप्रयोग मावळ तालुक्यातील काही भागात भातलावणी ज्यादिवशी संपते, त्या दिवसाकरिता वापरला जातो. ह्याचा अर्थ भात रोप लागवडीचा शेवटचा दिवस असा आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’, मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं, वाचा विशेष लेख
– मावळमधील शेतकऱ्यांचा मजूरांच्या तुटवड्यावर लई भारी उपाय! यंत्राच्या सहाय्याने करत आहेत भात लागवड
– प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या ‘या’ योजना तुम्हाला माहितीयेत का? नक्की जाणून घ्या…