व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

भात लागवड करत असताना मावळ तालुक्यात सध्या अनेक आधुनिक पद्धतींचा आणि तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे दिसते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 28, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Rice-Cultivated-Maval

Photo Courtesy : Vikas Gosavi


Dainik Maval News : भाताचे आगार अशी ओळख असणाऱ्या मावळ तालुक्यात साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच भात लावणीला सुरुवात होते. भात लागवड करत असताना मावळ तालुक्यात सध्या अनेक आधुनिक पद्धतींचा आणि तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे दिसत आहे. ( Rice Is Being Cultivated In Maval Taluka Using Modern Methods )

पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या भात लागवडीची कामे ही महिला भगिनी व पुरुष मंडळी एकमेकांच्या मदतीने करत  होती. त्यावेळेस सर्वांच्या माध्यमातून शेती कामे केली जायची. कारण यंञसामुग्री त्यावेळेस नव्हती. कामे ही पडकई म्हणजेच चार-पाच शेतकरी एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने भात शेतीची कामे मोठ्या उत्साहाने करत असायचे. त्यामुळेच भात लागवडीसाठी मोठी मदत एकमेकामधुन होत असे आणि भात लागवडी पटकन वेळेत उरकली जात होती.

त्यावेळी बैलांनी चिखलणी करणे जायचे. मात्र आज बैलांची जागा टॅक्टरने घेतली. नांगरटीसह, भात चिखलणी सर्वच कामे टॅक्टरने होवु लागली आहेत. चाळीस -पन्नास वर्षापूर्वी पावसाचे प्रमाणही जास्त असायचे, जास्त म्हणजे जवळपास दहा-दहा दिवस एकही माणुस घरातुन बाहेर पडत नव्हता आणि म्हणून पावसापासून संरक्षण करण्यासाठी ईरले व भाताचे रोपे उपटण्यासाठी टिवक्याचे प्रमाण हे जास्त असायचे. परंतु आता ह्या जुन्या पद्धतीच्या उपकरणाने कामे कमी होत चालली आहे.

  • बैल आणि औताचं प्रमाण ही कमी होत चाललंय. निसर्गाचा लहरीपणा, तरुणाईची शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. आता शेतीही आधुनिक पद्धतीने करण्यावर शेतकरी भर देऊ लागले आहेत. भात शेती मध्ये ट्रॅक्टर ला खूप महत्व आले आहे. शेतकरी चिखलणी ट्रॅक्टरने करून मावळ तालुक्यात काही ठिकाणी यंत्राने ही लागवड केली जात आहे. ईरण्याची‌ जागा आता प्लॅस्टिक रेनकोटने घेतली आहे, तर टिवक्याची जागा ही मोकळ्या तेल डब्यांनी घेतली आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त जुन्या आठवणी हे उद्गार गावातील वयोवृद्ध काढत आहे.

पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चारसूत्री, सगुणा राईस तंत्रज्ञान (एसआरटी), यंत्राने भात लागवड पूर्ण करून भात पेरणीचा आणि लागवडीचा प्रश्नच मिटवला आहे. त्याकामी कृषि विभागाचे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे. तालुक्यात एकूण क्षेत्राच्या जवळपास 45 ते 50 टक्के क्षेत्र हे सुधारित लागवड पद्धतीने लावले जाते.

शेतकऱ्यानी भात लागवडीवर होणार वारेमाप खर्च व लागवडीच्या वेळी जाणवणारी मजुरांची चणचण यावर मात केली आहे. नवनवीन भाताचे वाण, नवनवीन भात लागवडीच्या पद्धतीमुळे भात उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मावळ तालुक्यात नवनविन तंञज्ञानावर आज शेतकरी काम करत आहे. मनुष्य बळाचा कमी वापर करताना आज जुन्या पध्दती नामशेष होऊ लागल्या आहेत. बदलते स्वरूप अंगीकारणे गरजेचे आहे आणि ते शेतक-यांनी आपल्या शेतीत केले. ( Rice Is Being Cultivated In Maval Taluka Using Modern Methods )

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली पाहिजे. भात लागवड चारसूत्री, एस.आर. टी तंत्राने करून युरिया ब्रिकेट खताचा वापर करून उत्पादनात वाढ होईल ह्यासाठी प्रयत्न करावेत. पीक विमा भरावा, ई पीक पाहणी करावी. मावळ तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून शेती करू लागले आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या
– मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
– लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
– रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी


dainik maval jahirat

Previous Post

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

Next Post

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.