Dainik Maval News : मावळ तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात कोसळलेला मुसळधार पाऊस, आणि मागील चार पाच दिवसांपासून सुरू असलेला रिमझिम पाऊस यामुळे तालुक्यात डोंगर दऱ्यांचे सौंदर्य खुलले असून निसर्ग फुलला आहे. हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले अपोआपच मावळकडे वळू लागली आहेत. दुसरीकडे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तालुक्यातील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेले निर्बंध देखील प्रशासनाने हटविले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होताच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटकांनी मावळकडे धाव घेतली. ऐतिहासिक पर्यटनस्थळांनाही याचा मोठा फायदा झाला आहे.
मावळातील लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग किल्ल्यांकडे ट्रेकर्सची मोठी गर्दी झाली. लोणावळा-खंडाळा सह पवना, आंद्रा, कासारसाई, आंदर मावळ, नाणे मावळ भागात पर्यटनासाठी कुटुंबासमवेत पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. इतिहास आणि निसर्ग यांचा संगम अनुभवण्यासाठी राज्यभरातून आलेल्या पर्यटकांनी लेण्यांना भेट दिली.
टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट आणि इतर व्ह्यू पॉईंटवर दिवसभर पर्यटकांची लगबग सुरू होती. धुक्याने भरलेले दऱ्याखोरे आणि कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असल्याचे चित्र दिसत होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन
– मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)


