व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

1880 साली म्हणजेच सुमारे 146 वर्षांपूर्वी मजुरांसाठी ’एनर्जी बार’ म्हणून सुरू झालेली गुडदाणी म्हणजेच आजची चिक्की ही जीआय टॅग (भौगोलिक संकेत) मिळवून जागतिक स्तरावर लोणावळ्याची अधिकृत ओळख बनली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 20, 2026
in शहर, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या आणि ५० कोटींची वार्षिक उलाढाली असलेल्या लोणावळ्याच्या चिक्कीला भौगोलिक नामांकन अर्थात जीआय टॅग मिळाला. चार वर्षांपासून येथील नॅशनल चिक्कीचे मालक व्यापारी अभय पारख यांचे प्रयत्न सुरु होते. या मानामुळे चिक्कीच्या परदेशात होणाऱ्या निर्यातीला चालना मिळेल, अशी माहिती मगनलाल चिक्कीचे मालक मंगेश अग्रवाल यांनी दिली.

लोणावळा चिक्कीचा इतिहास :
1880 साली म्हणजेच सुमारे 146 वर्षांपूर्वी मजुरांसाठी ’एनर्जी बार’ म्हणून सुरू झालेली गुडदाणी म्हणजेच आजची चिक्की ही जीआय टॅग (भौगोलिक संकेत) मिळवून जागतिक स्तरावर लोणावळ्याची अधिकृत ओळख बनली आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस लोणावळा खंडाळा परिसरात भोरघाटात अत्यंत प्रतिकुल नैसर्गिक परीस्थितीत इंग्रजांची ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीची रेल्वेलाईन टाकण्याचे काम कामे सुरू होती. त्यापाठोपाठ 1905 ते 1911 दरम्यान टाटा कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पतील (हायड्रो इलेक्ट्रीक कंपनीच्या) धरणांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. या सर्वकाळात लोणावळा परिसरात गावातील मूळ लोकसंख्ये पेक्षा अधिक खूप मोठी कामगार वस्ती (लेबर पॅम्प) वास्तव्यास होती.

दिवसभर शारीरिक कष्ट करणाऱ्या या मजूरांना मुसळधार पाऊस व हिवाळ्यात कडाक्मयाची थंडी यांना सामोरे जात मेहनतीची काम करावी लागत. यासाठी त्यांना दैनंदिन आहारा व्यतिरिक्त अधिक शक्तिवर्धक आहाराची गरज होती. आणि त्यासाठी अतिशय स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गुळ आणि शेंगदाण्याला अन्य पर्याय नव्हता. या मजुरांसाठी एनर्जी फूड म्हणून गुळ व शेंगदाण्याचा वापर सुरू झाला. यापैकी गुळ अथवा शेंगदाणे दोन्हीही इथे होत नाहीत. पण हाच सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा पौष्टिक आहार असल्याने इथल्या स्थानिक व्यावसायिकांनी पळसाच्या पानातून शेंगदाणे आणि गुळ या पासून बनविलेली गुडदाणी तयार करून विकण्यास सुरूवात केली. पुढे हीच गुडदाणी चिक्की म्हणून प्रसिद्ध झाली.

आज लोणावळा शहरामध्ये चिक्की बनवणारे व विक्री करणारे अनेक व्यवसायिक आहेत. साधारणपणे 25 ते 30 प्रकारच्या चिक्की या बनवल्या जातात. लोणावळा शहरांमधील या चिक्कीला जीआय टॅग प्राप्त झाल्यामुळे तिची ओळख आता जागतिक स्तरावर होणार आहे व लोणावळा शहर देखील ‘चिक्की हब’ म्हणून या पुढील काळात जगभर ओळखले जाणार आहे.

लोणावळा शहरातील चिक्कीला जीआय टॅग मिळाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच या पुढील काळात लोणावळा शहरांमध्ये आल्यानंतर चिक्की हा पदार्थ प्रत्येक जण विश्वासाने व येथील भौगोलिक ओळख म्हणून विकत घेईल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन
– मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)


dainik maval jahirat

Previous Post

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

Next Post

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार 'एनडीआरएफ'चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.