पुणे व सातारा श्रमिक संघाशी संलग्न असलेल्या मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यात संघटनेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा गणेश वाळुंजकर यांची निवड करण्यात आली तर, उपाध्यक्षपदी जीवन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव इथे मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 2023 ते 2025 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी संघटनेची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. ( ganesh walunjkar elected as president of maval taluka gram panchayat staff association for third time )
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे;
अध्यक्ष – गणेश वाळुंजकर
उपाध्यक्ष – जीवन गायकवाड
सरचिटणीस – वसंतराव शिंदे
कार्याध्यक्ष – सहादू पोटफोडे
सहसरचिटणीस – सुखदेव गोपाळे
कोषाध्यक्ष – बाळासाहेब घाडगे
सहकोषाध्यक्ष – हरिभाऊ चोरघे
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार संघटनेचे अध्यक्ष वाळुंजकर यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा
– मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती