Dainik Maval News : लोणावळा शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत २ किलो ७० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अब्दुल शेख (गुरव वस्ती, कुसगाव बु.) हा शहरातील विविध भागांत गांजाची होम डिलिव्हरी करत असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पथकाने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि गांजासह त्याला पकडले. त्याचा एक साथीदार फरार झाला.
शेख याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वडगाव मावळ न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस पुढील तपास करत आहे.
गेल्याच आठवड्यात लोणावळा नगरपरिषदेच्या बैठकीत मावळ आमदार सुनील शेळके यांनी अंमली पदार्थ विक्रीबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई करत शहरात गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या