Dainik Maval News : ग्रामपंचायतीतील मूळ नोंदीमध्ये कायदेशीरपणे खाडोखोड करून फेरफार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार खडकाळा (कामशेत) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा लेखी आदेश गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी दिला आहे.
याबाबत कामशेत येथील महेंद्र नहार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटल्यानुसार, कामशेत ग्रामपंचायत येथील २००१ मधील मिळकत क्रमांक १४२१ च्या मूळ नोंदी अर्थात सरकारी दस्तावेजांमध्ये बेकायदेशीर खाडाखोड करून फेरफार केल्याचे अर्जात नमूद केले होते.
त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये नमुना नंबर ८ च्या रजिस्टरमध्ये खाडाखोड झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून अहवाल कार्यालयास सादर करावा, असा आदेश कामशेत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांना गटविकास अधिकारी यांनी दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro
