व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! वडगाव फाट्यावर प्लास्टिकपासून ऑइल बनवणाऱ्या कंपनीत वायू गळती, वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली

मावळ तालुक्यात वडगाव फाटा इथे उर्से रोड परिसरात असणाऱ्या ओम साई एंटरप्राईस या कंपनीत वायू गळती झाल्याने परिसरात रसायनमिश्रीत वायूच्या धूराचे लोट पसरले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 29, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
maval-taluka-accident-breaking

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यात वडगाव फाटा इथे उर्से रोड परिसरात असणाऱ्या ओम साई एंटरप्राईस या कंपनीत वायू गळती झाल्याने परिसरात रसायनमिश्रीत वायूच्या धूराचे लोट पसरले होते. रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परंतू अग्निशमन दल, आपदा मित्र आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांनी वेळीच बचावकार्य केल्याने संभाव्य धोका टळला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सोमवार दिनांक 26 जून रोजी रात्री साधारण 10:30 च्या सुमारास वडगाव फाटा परिसरात प्रचंड धुराचा लोट दिसत असून एखादा केमिकल कंटेनर पलटी झाला असावा असा फोन वडगाव वाहतूक विभागाकडून एमआयडीसी अग्निशामक तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला आला असता. तेव्हा त्या ठिकाणी अग्निशमन विभागाचे दिपक दोरुगडे व स्टाफ यांनी त्वरित त्या ठिकाणी पोहचून परिस्थितीचे पाहणी केली. ( Gas leak at Om Sai Enterprise Company in Vadgaon Phata Urse Road area of ​​Maval Taluka )

सीआरपीएफ पासून अनेक भागात संपूर्ण धूर पसरलेला होता, तसेच केमिकलच्या वासामुळे वाहन चालवणे देखील अवघड होते. अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसी विभाग तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद, आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनेक सदस्य त्या ठिकाणी पोहोचून ओम साई कंपनीमध्ये केमिकल मध्ये अंधारामध्येच नियंत्रण मिळवत मोठी दुर्घटना रोखली.

तळेगाव दाभाडे अग्निशामक दल, एम आय डी सी अग्निशामक दल तळेगाव दाभाडे, आपदा मित्र मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. एमआयडीसी अग्निशमन विभागाचे दिपक दोरुगडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे शेखर खोमणे, आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, सदस्य सर्जेस पाटील, गणेश ढोरे, शुभम काकडे, प्रशांत शेंडे, कुणाल दाभाडे, विनय सावंत, सत्यम सावंत इतर उपस्थित होते.

“ओम साई एंटरप्राईज वडगाव फाटा उर्से रोड प्लास्टिक पासून ऑइल तयार करते. कंपनीत लाईट गेल्यामुळे कूलर बंद झाला, नंतर प्रेशर वाढला. तापमान वाढल्याने कंटेनरचा ग्लास फुटून वायू आणि मटेरियल गळती सुरु झाली. पाईप लीक होऊन गॅस बाहेर आला” – दिपक दोरुगडे (एमआयडीसी अग्निशमन विभाग)

अधिक वाचा –
– भर पावसात आमदार सुनिल शेळकेंचे नागरिकांकडून जंगी स्वागत; वडगावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन अन् लोकार्पण
– मोठी बातमी! लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक, दुपारच्या सत्रातील ‘या’ लोकल रद्द


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत पोलिसांकडून पंडित नेहरू विद्यालयात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यशाळा

Next Post

मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट? पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 2 आरोपींना अटक । Kishor Aware Murder Case

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kishore-Aware-murder

मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट? पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 2 आरोपींना अटक । Kishor Aware Murder Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.