Dainik Maval News : यंदा बुधवार, 27 ऑगस्ट ते शनिवार, 6 सप्टेंबर या काळात गणेशोत्सव होता. राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे यंदाच्या उत्सवाचा रंग काही वेगळाच होता. गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वांनी गणेश उत्सवाचा आनंद घेतला, तसेच हा सण भव्य दिव्य साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच गजबजलेल्या बाजारपेठांमध्येही मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये गणेशोत्सव काळात मोठी खरेदी विक्री झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.
मावळ तालुक्यात कामशेत, लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, देहू या प्रमुख बाजारपेठा आहेत., तर पवनानगर, टाकवे बुद्रुक या गावांजवळील काही दुय्यम बाजारपेठा आहे. गणेशोत्सवापूर्वीच व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानात उत्सवाच्या अनुषंगाने मालाची चांगली व मोठ्या प्रमाणात उपलब्धी करून ठेवली होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अगोदरपासून साधारण २३ – २४ तारखेपासून नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांकडे पाऊले वळविली होती.
गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा नसून तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा उत्सव यामुळे ठरला आहे. देशभरात यंदा गणेशोत्सव काळात 30 ते 35 हजार कोटींची उलाढाल झाल्याची आकडेवारी समोर येत आहे, तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा सण उत्सवात अग्रेसर असणारा तालुका असल्याने एकट्या मावळात जवळपास 25 कोंटींची उलाढाल या काळात झाल्याचे निदर्शनास येत आहे.
मावळातील प्रमुख बाजारपेठांपैकी तळेगाव दाभाडे शहरातील बाजारपेठेत सर्वाधिक आर्थिक उलाढाल झाली, तर त्या खालोखाल कामशेत बाजारपेठेत सर्वाधिक उलाढाल झाली आहे.
बाजारपेठेतील दुकानदारांसह मावळातील ढोल-ताशा पथक हेही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कला सादर करत असतात. अशा कला पथकांनाही यंदा अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याबाहेर गेलेल्या पथकांना सुमारे 70 ते 75 लाख रुपयांची कमाई झाल्याची माहिती मिळत आहे,. तर, छोट्या-मोठ्या 70 पथकांना सरासरी 51 हजारांपर्यंत सुपारी मिळाली यातून 30 ते 35 लाख रुपयांची कमाई झाल्याटचा अंदाज आहे. एकूण यंदा गणेशोत्सवात बाप्पा सर्वांनाच पावला असे म्हणावे लागेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha

