व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गणेशोत्सवामुळे मावळ तालुक्यातील व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’ ; गौरी-गणपती सणाच्या दिवसांत मावळात कोट्यवधीची उलाढाल

मावळातील प्रमुख बाजारपेठांपैकी तळेगाव दाभाडे शहरातील बाजारपेठेत सर्वाधिक आर्थिक उलाढाल झाली, तर त्या खालोखाल कामशेत बाजारपेठेत सर्वाधिक उलाढाल झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 10, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Ganpati-Bappa-Photo-Image

Photo Courtesy : IG / ganpati_bappa_morya__


Dainik Maval News : यंदा बुधवार, 27 ऑगस्ट ते शनिवार, 6 सप्टेंबर या काळात गणेशोत्सव होता. राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे यंदाच्या उत्सवाचा रंग काही वेगळाच होता. गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वांनी गणेश उत्सवाचा आनंद घेतला, तसेच हा सण भव्य दिव्य साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच गजबजलेल्या बाजारपेठांमध्येही मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये गणेशोत्सव काळात मोठी खरेदी विक्री झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

मावळ तालुक्यात कामशेत, लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, देहू या प्रमुख बाजारपेठा आहेत., तर पवनानगर, टाकवे बुद्रुक या गावांजवळील काही दुय्यम बाजारपेठा आहे. गणेशोत्सवापूर्वीच व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानात उत्सवाच्या अनुषंगाने मालाची चांगली व मोठ्या प्रमाणात उपलब्धी करून ठेवली होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अगोदरपासून साधारण २३ – २४ तारखेपासून नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांकडे पाऊले वळविली होती.

गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा नसून तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा उत्सव यामुळे ठरला आहे. देशभरात यंदा गणेशोत्सव काळात 30 ते 35 हजार कोटींची उलाढाल झाल्याची आकडेवारी समोर येत आहे, तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा सण उत्सवात अग्रेसर असणारा तालुका असल्याने एकट्या मावळात जवळपास 25 कोंटींची उलाढाल या काळात झाल्याचे निदर्शनास येत आहे.

मावळातील प्रमुख बाजारपेठांपैकी तळेगाव दाभाडे शहरातील बाजारपेठेत सर्वाधिक आर्थिक उलाढाल झाली, तर त्या खालोखाल कामशेत बाजारपेठेत सर्वाधिक उलाढाल झाली आहे.

बाजारपेठेतील दुकानदारांसह मावळातील ढोल-ताशा पथक हेही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कला सादर करत असतात. अशा कला पथकांनाही यंदा अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याबाहेर गेलेल्या पथकांना सुमारे 70 ते 75 लाख रुपयांची कमाई झाल्याची माहिती मिळत आहे,. तर, छोट्या-मोठ्या 70 पथकांना सरासरी 51 हजारांपर्यंत सुपारी मिळाली यातून 30 ते 35 लाख रुपयांची कमाई झाल्याटचा अंदाज आहे. एकूण यंदा गणेशोत्सवात बाप्पा सर्वांनाच पावला असे म्हणावे लागेल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha 


Previous Post

लोणावळा येथील शिक्षिका तृप्ती निकम यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ; मावळातील ‘या’ शिक्षकांचाही सन्मान

Next Post

शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Namo Shetkari Yojana Rs 1892 crore deposited in bank accounts of 91 lakh 65 thousand 156 farmers in maharashtra

शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.