Dainik Maval News : कासारसाई दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गव्हाणपूजन व मोळी पूजन समारंभ अतिशय उत्साहाने आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्रीक्षेत्र देहू संस्थांनचे अध्यक्ष ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावर्षीचा हा २७ वा गाळप हंगाम असून यावर्षी पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल असे नियोजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, तुकाराम विनोदे, चेतन भुजबळ, दिलीप दगडे, शिवाजीराव पवार, बाळासाहेब बावकर, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, महादेव धुडे, शामराव राक्षे, दिनेश मोहिते, प्रवीण काळजे, सखाराम गायकवाड आदी मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल चालू असून कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, संचालक मंडळ व प्रशासन यांच्या अतिशय व्यवहारदक्ष कारभारामुळे कारखाना हा फायद्यात चाललेला असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी होतो असे प्रतिपादन सल्लागार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन कारखान्याचे कार्यकारी अधिकारी साहेबराव पठारे व सचिव मोहन काळोखे यांनी केले होते. सूत्रसंचालन चेतन भुजबळ यांनी तर आभार प्रदर्शन अनिल लोखंडे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी कारवाई ! मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्यावर एकाच दिवशी दोन मोटारीतून लाखोंची रोकड जप्त । Maval Crime
– नाणोली इंदोरी परिसरात बिबट्याची दहशत ; वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गरीब मेंढपाळाच्या दोन शेळ्या ठार । Maval News
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha