Dainik Maval News : शिरगाव (ता. मावळ) येथे पवना नदीच्या कडेला असलेल्या एका गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (दि.२७) छापा टाकला. याकारवाईत एकूण ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दहा हजार लीटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच एका २१ वर्षीय महिला आरोपीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
प्रसाद राजेन्ना जंगिलवाड (पोलीस कॉन्स्टेबल, शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशन) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलिसचे पोहवा बगाड हे करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोमवारी (दि.२७) शिरगाव गावचे हद्दीत सुरेश गायकवाड यांच्या शेताच्या जवळील पवना नदीचे कडेला असलेल्या मोकळ्या जागेतील गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ३ लाख ५० हजार किमतीचे प्रतिबंधित दहा हजार लीटर रसायन भिजत घालताना महिला आढळून आली, परंतु पोलिसांची चाहूल लागताच ती पळून गेली, असे फिर्यादीत नमुद आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड