“जनरल मोटर्स कंपनी बंद पडल्याने हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड आली असताना राज्यातील नेत्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. एवढे कामगार उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचा शाप लागेल,” अशा संतप्त भावना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या. विजय वडेट्टीवार यांनी तळेगाव एमआयडीसी सर्कल इथे सुरु असलेल्या बेमुदत साखळी उपोषणातील आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ( General Motors workers on hunger strike Opposition leader Vijay Wadettiwar met workers maval )
कामगारमंत्री हे दुतोंडी सापासारखे –
“तळेगाव एमआयडीसी ही विलासराव देशमुख यांनी सर्वांगीण विकासासाठी उभी केली. जनरल मोटर्सला टॅक्समध्ये सवलत देऊन महाराष्ट्रात उद्योगांना चालना मिळावी, म्हणून फुकटात जमीन दिली. आता ती कंपनी बंद पडली आहे. हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षनेते असताना मंत्री सुरेश खाडे यांना दिलं होतं. त्यांनी पत्र पाहिला पाहिजे होत आणि कामगारांच्या भावना जाणून घ्यायला होत्या. पण तसे न करता कंपनीला क्लोजर मंजुरी दिली. सुरेश खाडे हे दुतोंडी सापासारखे आहेत,” अशा तिखट शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
विधानसभेत हा प्रश्न लावून धरणार –
“सुरेश खाडे यांनी घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यांना कुणाचा फोन आला? की मलिदा मिळाला हे पाहावे लागणार आहे. विधानसभेत हा प्रश्न आम्ही लावून धरणार” असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जनरल मोटर्स कंपनी प्रकरण नक्की काय आहे?
जनरल मोटर्स ही तळेगाव एमआयडीसीतील मोठी कंपनी असून हजारो कामगारांचे कुटुंब या कंपनीवर अवलंबून होते. परंतू कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील कामगार देशोधडीला लागले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कामगार संघटनेकडून न्यायालयासह विविध पातळीवर संघर्ष सुरु आहे. जे कामगार ऐन तारुण्यात वयाच्या पंचविशीत कंपनीत रुजू झाले. सुमारे 13 वर्ष कायमस्वरुपी म्हणून काम केल्यानंतर अचानक त्यांच्या हक्काचा रोजगार त्यांच्याकडून हिरावला जातोय. तर दुसरीकडे आज सद्यस्थितीत वयाच्या चाळीशीत असणाऱ्या कामगारांना कुठे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाहीये. कंत्राटी नोकरीवर त्यांचे कुटुंब चालवता येत नाही, अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. अखेर जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार अन्यायग्रस्त कामगारांनी त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी संपूर्ण कुटुंबीयांसमवेत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत तळेगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर ‘बेमुदत साखळी उपोषणाला’ सुरुवात केली आहे. उपोषण सुरु होऊन आठ दिवस उलटले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार
– महागाव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी योगिता सावंत बिनविरोध । Gram Panchayat Election
– जनरल मोटर्सच्या कामगारांचे उपोषण : ‘सरकारला कामगारांचे देणे-घेणे नाही, स्वतःचे हित जपण्यात सरकार व्यस्त’ – रोहित पवार