व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, आज आणखीन 2 मृतदेह सापडले, शासनाकडून ‘इतकी’ मदत जाहीर ! Ghatkopar Hoarding Collapse

मुंबईतील घाटकोपर इथे पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वरून आता 16 वर पोहोचली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 15, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
Ghatkopar Hoarding Collapse

Ghatkopar Hoarding Collapse


Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईतील घाटकोपर इथे पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वरून आता 16 वर पोहोचली आहे. तर जखमींची संख्या 88 झाली आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला 40 तास उलटून गेले असून अद्यापही इथे बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य सुरू असताना आज (दि. 15 मे) सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले आहे. त्यामुळे काल 14 असलेली मृतांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. अद्यापही काही लोक या होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

घटना घडली तिथे पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरु आहे. पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचावकार्यातील पथक काम करत आहे. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) प्रदर्शित करण्यासाठी पालिकेचा परवाना घेतलेला नाही, अशा सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. ( Ghatkopar Hoarding Collapse Two more bodies located under debris at hoarding collapse site in Mumbai NDRF official )

Two more bodies located under debris at hoarding collapse site in Mumbai: NDRF official

— Press Trust of India (@PTI_News) May 15, 2024

शासनाकडून मदत जाहीर –
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून जखमींना सरकारमार्फत मोफत उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता या दुर्घटनेतील जखमींना देखील सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. दुर्घटनेमध्ये किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. 60 टक्क्यांपर्यंत अपंगत्व आलेल्यांना 75 हजार रुपये मदत म्हणून सरकार देणार आहे. तर 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आलेल्यांना अडीच लाख रुपये देण्यात येणार आहेत.

अशी घडली दुर्घटना –
घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पोलिस ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी (दि. 13 मे) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक मोठे होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. मुसळधार पावसामुळे पेट्रोल पंपाच्या आडोशाला अनेक जण आपली वाहने घेऊन उभे होते. तर काही वाहन चालक याठिकाणी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅस भरण्यासाठी आले होते. अशामध्ये अचानक पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यामुळे हे सर्वजण त्याखाली दबले गेले.

अधिक वाचा –
– शिलाटणे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ, कार्ल्यात चारचाकी वाहनाचे झाले नुकसान
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News
– पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News


Previous Post

मोदींचा सत्कार करताना जिरेटोप भेट, ‘छत्रपतींचा जिरेटोप चढवला आता सिंहासनावरही बसवणार का?’, महाराष्ट्रात संतापाची लाट – Video

Next Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना कला गौरव पुरस्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Actress Vishakha Subhedar

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना कला गौरव पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.