(वडगाव मावळ) आज मंगळवार,(दिनांक 28 मार्च) रोजी वडगाव शहर भाजपाच्या वतीने आणि वडगाव नगरपंचायतचे नगरसेवकर रविंद्र बाळासाहेब म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून वडगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्या मंदिर या ठिकाणी 5 सगंणक संचांचे वाटप माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ भाजपा चे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी मनोगतामध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शाळेसाठी DPC च्या माध्यमातून क्रिडांगण, ग्रंथालय साठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी मनोगतामध्ये नगरसेवक रविंद्र म्हाळसकर यांनी दिलेले संगणक शाळेतील विध्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करेल, असे मत व्यक्त केले. ( Gift 5 computer sets to New English School Primary School in Vadgaon City from Corporator Ravindra Mhalskar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी उपस्थितांमध्ये मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, सिनेक्रॉन कंपनीचे एच आर राजेश आगळे, वडगाव नगरपंचायतीचे भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे , नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, नगरसेविका अर्चना म्हाळसकर, शाळेच्या मुख्याध्यपिका लेंढे मॅडम, शालेय शिक्षण समितीचे समन्वयक मनोज ढोरे,कार्यध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, मा नगरसेवक ॲड विजयराव जाधव;
भुषण मुथा, श्रीधर चव्हाण, वडगाव सोसायटी चे व्हाईस चेअरमन पंढरीनाथ भिलारे, मा सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, ॲड अजित वहिले ,गणेश भालेकर, सहकार आघाडी अध्यक्ष सोमनाथ काळे, शरद मोरे, खंडूशेठ भिलारे, शांताराम म्हाळसकर, संतोष म्हाळसकर, प्रमोद म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, कुलदीप ढोरे, नितीन गाडे, हारिष दानवे, आकाश म्हाळसकर आदीसह न्यु इंग्लिश स्कुलचे सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, सूत्रसंचालन राजेंद्र म्हाळसकर यांनी तर आभार मनोजभाऊ ढोरे यांनी मानले.
अधिक वाचा –
– दिवड, ओव्हळे गावातील पाणीपुरवठा योजनांचे काम युद्धपातळीवर सुरु, लवकरच घरोघरी येणार जलगंगा
– ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन