Dainik Maval News : वडगाव मावळ येथे रस्ता ओलांडताना दोन मोर पक्षी जखमी झाले होते. त्या दोन्ही मोरांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. संजिविनी मानकर आणि पिंटु मानकर यांनी यो दोन्ही मोरांचे जीव वाचविले आहेत. वडगाव येथे रस्तो ओलांडताना दोन मोर जखमी झाल्याची माहिती त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे यांनी माहिती मिळताच मोर ताब्यात घेऊन ते वन विभाग वडगाव मावळ यांच्या ऑफिसात नेले, आणि वन परीमंडळ अधिकारी एम ऐस हिरेमठ यांच्याकडे दिले. त्यानंतर पुढील तपासासाठी वन्यमित्र जिगर सोळंकी हे तिथे पोचले. प्रथमोपचार करुन मोरांना नंतर पुणे येथे पाठविण्यात येत आहे. ( Giving life to injured peacocks Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– वडगाव येथे शिवक्रांती कामगार संघटनेचा कामगार मेळावा आणि वेतनवाढी स्वाक्षरी समारंभ संपन्न । Vadgaon Maval
– रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच मावळच्या वतीने श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर येथे फराळ वाटप । Maval News
– आमदार सुनिल शेळके आणि सत्यजित तांबे यांच्या हस्ते लोणावळ्यात ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियान माहिती पत्रकाचे अनावरण । Lonavala News