काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील कान्हे गावातील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. अशात शुक्रवारी नाणे मावळ भागातील पाले गावात एका गरीब शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करुन त्यांना ठार केल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यातही सातत्याने बिबट्याचा वावर होऊ लागल्याने नाणे मावळ, आंदर मावळ भागातील गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ( Goats Killed In Leopard Attack At Pale Village Nane Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवार (दिनांक 13 जानेवारी) रोजी दुपारी पाले गावातील डोंगर पठारावर बिबट्याने हल्ला केला. यात गरीब शेतकऱ्याच्या शेळ्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण जानकू भगत हे त्यांच्या शेळ्यांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. तेव्हा तिथे अचानक बिबट्या आला आणि त्याने केलेल्या हल्ल्यात भगत यांच्या दोन शेळ्या ठार झाल्या. त्यामुळे नाणे मावळ भागातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी हल्ला करणारे बिबट्या दिवसाढवळ्या येऊ लागल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन
– सीएच्या हाताखाली काम करणाऱ्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली, तळेगावचा शार्दूल कसा बनला सीए? पाहा संपूर्ण मुलाखत