Dainik Maval News : लोणावळा शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांची सोनसाखळी लंपास करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हा डाव साधला. यात चोरांनी दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
मंगळवारी (दि. २२ जुलै) रात्री आठ ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या. पहिल्या घटनेप्रकरणी मंगल चंद्रकांत मराठे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
फिर्यादी मंगल मराठे ह्या रात्री आठच्या सुमारास रेल्वे इन्स्टिट्यूट येथील बराकी चाळीच्या रस्त्याने त्यांच्या नातीला घेऊन जात होत्या. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मराठे यांचे मंगळसूत्र हिसकावत पळ काढला.
दुसऱ्या घटनेत तुंगार्ली चौकातून माधवी अंभोरे या जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. दरम्यान, शहरात रहदारी असतानाही चोरट्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा